८२) स्वतः चा स्वाभिमान जपत इंग्रजांना सडेतोड उत्तर देणारे एकमेव सार्वभौम राजे आणि अनेक बाबतीत इंग्रजांचा विचारांनी पराभव करणारे मुत्सद्दी राजा होते.
८४) राज्याच्या तिजोरीतून आणि स्वतः खासगी फंडातून करोडो रूपयांचे समाजोपयोगी कामासाठी दान देणारा हिंदुस्थानातील एकमेव राजा.
८५) स्मशानात ग्रंथालयांची निर्मिती केली आणि अंत्यविधीस येणाऱ्या लोकांना अंघोळीस खास गरम पाण्याची सोय करणारा राजा.
८७) सयाजीराव महाराज प्रत्येक दौरा आणि खासगीच्या खर्चाचा तपशील जाहीर करत. त्यांच्या कारभारात पारदर्शकता होती. (माहिती अधिकाराची गरजच निर्माण झाली नाही.)
८९) सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानात दुष्काळ पडल्यावर जो दौरा काढला त्यात परिस्थिती पाहून जागेवरच रकमा मंजूर केल्या.
९०) बडोद्यात आपली कला सादर करण्यासाठी अनेक कलाकार येत. परंतु त्यांच्यात बीभत्सपणा अधिक असे. आपल्यास बक्षीस मिळावे म्हणून अनेक अनुचित प्रकारही कलांत घुसवत. यासाठी कला सादरीकरण पूर्व एका खास समितीपुढे त्यांची कला सादर करावी लागे. त्या समितीची परवानगी मिळाली तरच कला सादर करता येत असे. (सेन्सार बोर्ड)
९१) सयाजीराव महराजांच्या चरित्रकारांनी त्यांना ‘प्लेटोच्या तत्त्ववेत्या’ची, राजाभोज, धारच्या परमावंशी मुंज, कनोजच्या प्रतिहारवंशी भोज व महेंद्रपाल अशा विद्वान आणि प्रतिभावान राजांची उपमा दिली.