७२) सयाजीराव महाराजांच्या स्वतःच्या ग्रंथालयात वीस हजार ग्रंथ होते. एवढे ग्रंथ असणारा जगातील एकमेव विद्वान राजा म्हणता येईल. सयाजीराव महाराज प्रज्ञावंत राजे होते.
७३) सयाजीराव महाराजांनी देशांतर्गत आणि परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देताना विद्याशाखा, जाती आणि धर्म यांचे बंधन पाळले नाही.
७४) मनोरुग्णांना तुरुगांत न टाकता त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे या नात्याने त्यांच्यासाठी सुधारगृहे आणि शाळा काढल्या.
७७) हिंदुस्थानातील तसे परदेशातीलही अनेक विद्वान आणि गुणीजनांना बडोद्यात आणले. सर्व जातींच्या आणि धर्माच्या व्यक्तींना समावेश केला. (गुणग्राहक राजा)
७९) ‘महाराजा सयाजीराव यांनी केलेले कायदे हे युरोप-अमेरिका या सुधारलेल्या देशांहून पुढारलेले होते.’ – असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले आहे.
८०) समकालीन जगात उत्कृष्ट वास्तू बडोद्यात निर्माण केल्या. (लक्ष्मी-विलास राजवाडा, कीर्तीमंदीर, खंडेराव मार्केट, सेन्ट्रल लायब्ररी, बडोदा कॉलेज आणि इतर)