६१) सयाजीराव महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत लाखो रूपयांची शिष्यवृत्ती दिली. त्यातील फक्त पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी ८३ हजारांपेक्षा जास्त रुपयांची मदत केली. डेक्कन मराठा एज्युकेशन आसोशिएसनला ७४ हजारांपेक्षा अधिक रक्कम दिली.
६२) महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रमुख शिक्षण संस्थांना महाराजांनी मदत केली. (डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, शिवाजी शिक्षण संस्था पुणे, मराठा विद्या प्रसारक संस्था या अशा अनेक संस्थांना मदत केली.)
६५) सयाजीराव महाराजांनी १. कैसरकडून सुलतानकडे, २. दुष्काळी दौऱ्याच्या नोंदी आणि ३. Goods and Bads हे ग्रंथ लिहिले.
६७) सयाजीराव महाराजांनी केलेली २३१ भाषणे प्रकाशित करण्यात आलेली आहेत. तसेच ‘महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा महाराष्ट्रातील सत्कार’ ग्रंथातील भाषणे वेगळी आहेत.
६९) सयाजीराव महाराजांनी १. हिंदुस्थानातील राजपुत्रांचे शिक्षण, २. हिंदुस्थानातील मागासलेल्या वर्गांचे शिक्षण आणि ३. माझा युरोप व हिंदुस्थान देशातील कार्यक्रम व दिनचर्या ४. पतित जाती (The Depressed Classes) या विषयांवर (त्या काळातील ज्वलंत विषय) लेख लिहिले.