५१) अखिल भारतीय अस्पृश्यता परिषदेचे सयाजीराव महाराजांच्या हस्ते मुंबई येथे उद्घाटन केले. (२७ ऑगस्ट १९३३)

५२) शिकागो येथील दुसऱ्या जागतिक धर्मपरिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराजांची निवड झाली. ( इ.स. १९३३)

५३) अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदी महाराजांची निवड झाली. (२४ मार्च १९३४)

५४) जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षस्थानी महाराजांची निवड झाली. (१ जुलै १९३५)

५६) सयाजीराव महाराजांनी राज्याभिषेकाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी उभारला.

५७) हीरक मोहत्सावाच्या निमित्ताने महाराजांनी उभारलेल्या फंडातून ‘water supply for cattle etc.’ साठी १,३७,०५३ रुपये खर्च केले. ही हिंदुस्थानातील पहिलीच घटना होती. (इ.स. १९३७-४०)

५८) सयाजीराव महाराजांनी संपूर्ण संस्थानात, सर्व शिक्षण संस्थात, सर्व वर्गासाठी शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. (इ.स.१९३६)

५९) सयाजीराव महाराजांनी अनेक कलावंतास मदत केली. (बालगंधर्व, राजा रविवर्मा, अब्दुल करीम खान, भातखंडे, दादासाहेब फाळके)