४२) धर्मखात्याची स्थापना केली. पुरोहितांसाठी परीक्षा घेऊन लायसन्स देण्याचा कायदा केला. (५ जानेवारी १९१५)

४३) देशी भाषेतील ग्रंथ प्रकाशनासाठी दोन लक्ष रुपयांची देणगी दिली. (ऑक्टोबर १९१५) महाराजांच्या कार्यकाळात निरनिराळ्या भाषेतून दोन हजारांपेक्षा जास्त ग्रंथ प्रकाशित झाले.

४४) महाराजांना गादीवर बसून पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील जमीन महसुलाच्या चार लक्ष रुपयांच्या बाकीपैकी तीन लक्ष रूपयांची प्रजेला सूट देण्यात आली. (इ.स. १९२५)

४६) प्रजेच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून संगीतविषयक, नाटक किंवा इतर कोणताही कार्यक्रम बरोबर रात्री ८ वाजता सुरू करून १२ वाजता बंद करण्याचा नियम केला.

४७) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहाव्या संमेलनाचे बडोद्यात आयोजन केले. (२४ ऑक्टोबर १९०९) त्यांनतर २६ नोव्हेंबर १९२१ रोजी आणि इ.स.१९३४ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे बडोद्यात आयोजित केली गेली.

४८) सयाजीराव महाराजांनी प्रजेला हक्काचे घर मिळावे म्हणून ‘घरकुल योजना’ सुरू केली. (बडोद्यात पूर आल्यावर घर पडलेल्या लोकांसाठी घरांसाठी ही योजना सुरू केली.)

५०) कोल्हापूर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सयाजीराव महाराजांची निवड झाली. (१८ डिसेंबर १९३२)