३१) ‘धारासभा’ (अर्थात राज्य विधिमंडळ) स्थापना (इ.स.१९०७) या सभेवर मागासवर्गाचा प्रतिनिधी म्हणून डॉ.आंबेडकरांची निवड केली.
३२) ग्रंथ निर्मितीसाठी साहित्यिकांना, प्रकाशकांना मदत केली. महाराज साहित्यिक आणि प्रकाशकांचे पोशिंदे होते. ‘भाषांतर शाखा’ निर्माण केली.
३४) सेन्ट्रल लायब्ररीची (मध्यवर्ती ग्रंथालय) स्थापना केली. या ग्रंथालयात महाराज हयात असताना एक लाखापेक्षा जास्त ग्रंथ होते. (१२ डिसेंबर १९१०)
३५) मध्यवर्ती ग्रंथालयातील ‘वृत्तपत्र वाचन विभाग’ वर्षाचे ३६५ दिवस सकाळी ८ पासून संध्याकाळी ८ पर्यंत खुला असे.
३६) महाराजांनी बडोदा संस्थानात मोफत सार्वजनिक ग्रंथालयांचा पाया घातला. इ.स. १९३९ साली बडोदा संस्थानात सार्वजनिक मोफत ग्रंथालयांची संख्या १५०४ होती. (गाव तेथे वाचनालय)
३७) ज्या गावात ग्रंथालय उभारणे करणे शक्य नव्हते अशा गावांसाठी फिरती ग्रंथालये ‘सयाजी वैभव’ सुरू केली. ही योजना आजही सुरू आहे.