१२) पूर्वपरंपरा आणि चालीरीतींना सोडून महाराणींसह पहिला युरोप प्रवास केला. (३१ मे १८८७ ते २० फेब्रुवारी १८८८) 1888 साली शेती सहकारी बँकेची सुरुवात केली.
१५) बडोद्यातील परंपरेने दक्षिणा म्हणून वाटली जाणारी खिचडी आणि ग्यारमीची पद्धत बंद केली. फक्त अपंग निराधार लोकांना सुरू ठेवली. (३१ जुलै १८९०) (यावर पाऊणे पाच लाख रुपये खर्च होत असे तो महाराजांनी सदतीस हजारांवर आणला.)
१७) सामाजिक सुधारणा (बालविवाह विरोधी कायदा, लग्नविच्छेद म्हणजे घटस्फोट कायदा, हिंदू पुनर्विवाह कायदा, वारसा हक्क कायदा, दत्तकविधान कायदा, संन्यासासाठी कायदा) केल्या. (संन्यासासाठी वयोमर्यादा आणि पत्नीची परवानगी आवश्यक)
१८) स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका स्थापून लोकशाही आणि संविधानाचा पाया घातला. या संस्थांना स्वयंनिर्णयाचे अधिकार दिले. या प्रत्येक संस्थेचा सदस्य साक्षर असावा अशी अट घातली. लोकशाहीची सुरूवात केली. (इ.स.१८९१)
२०) श्री. शिवकर बापूजी तळपदे या संस्कृत पंडितास पहिल्या विमान उड्डाण प्रयोगास महाराजांनी मदत केली. हा प्रयोग पाहण्यास सयाजीराव महाराज, लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती रानडे मुंबई (चौपाटी) येथे उपस्थित होते. (इ.स.१८९५)