९६) मंदिरांतील पुजारी होण्यासाठी ‘पुजारी परीक्षा’ घेतल्या आणि धार्मिक विधी करण्यासाठी ‘लायसन्स’ दिले. यजमानास पुजेचा अर्थ समजून सांगण्याची सक्ती केली.
९७) श्रावण महिन्यातील दक्षिणा देण्यासाठी महाराजांनी दोन विषयांच्या परीक्षा प्रती वर्ष घेण्याचे ठरवले. जे परीक्षा पास होतील त्यांनाच दक्षिणा देण्याचे ठरवले. (पूर्वी सरसकट दक्षिणा दिला जात असे.) परीक्षेमुळे लाखो रुपयांची बचत झाली.
९८) सयाजीराव महाराजांच्या पूर्वी असलेल्या राज्यकर्त्यांच्या काळातील कररुपाने असलेले १ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी माफ केले.
१००) सयाजीराव महाराजांनी मदत केलेल्या संस्थांनी आणि व्यक्तींनी महाराजांना मानपत्रे दिली. ती साधारणपणे ११२ आहेत.