०१) गोपाळ हा शेतकऱ्याचा मुलगा. महाराणी जमनाबाईसाहेब यांनी ‘तुम्ही इथं कशाला आलात?’ या प्रश्नाला ‘मी राजा होण्यासाठी आलो आहे.’ असे आत्मविश्वासाने उत्तर दिलेले दत्तक निवड होवून बराव्या वर्षी १८७५ ला सयाजीराव राजा बनले.
०३) राज्यकारभार हाती येताच सर्वप्रथम राज्याच्या सर्व भागांची पाहणी केली. (हुजूर सवारी इ.स १८८१ ते इ.स १८८५)
०५) राजाने लेखी ‘हुजूरहुकूम’ देण्याची पद्धत सुरू केली. (प्रशासनात एखादा विचार मनात आला की, तो विसरून जाऊ नये यासाठी ते कार्यालयात, प्रवासात, घोड्यावर रपेट मारताना, झोपण्याच्या पलंगाशेजारी कोरे कागद आणि पेन्सिल सोबत ठेवत.)
०८) सरकारी खर्चाने अस्पृश्य आणि आदिवासींच्या शिक्षणासाठी सोनगड या भागात शाळा सुरू केल्या. (इ.स. १८८२)