सामाजिक सुधारणा

सामाजिक सुधारणा

                सयाजीरावांच्या समाजसुधारणा देशभरात आदर्श ठराव्यात अशा होत्या. शिक्षण विभागात धर्मखाते सुरू करून पुरोहितांना परीक्षा सक्तीची केली. पास होणार्‍यास परवाना दिला जाऊ लागला. अस्पृश्य, गडारा आदिवासी आणि ब्राह्मणेतरांसाठी वेदोक्त पाठशाळा सुरू केली. स्वत:चे खंडोबा मंदिर अस्पृश्यांना खुले केले. बालविवाहबंदी, विधवा पुनर्विवाह, मुला-मुलींचे विवाहाचे वय, दानधर्माचा कायदा, ग्रहणाची सुटी बंद, अस्पृश्यांना मंदिर-सरकारी कार्यालयात मुक्त प्रवाशाचे कायदे केले. पगारी कीर्तनकारास प्रबोधनाचे काम दिले. राजवाड्यातील पंगतिभेद दूर केले. ‘सयाजीरावांनी केलेल्या सुधारणा व कायदे युरोप अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशाहून सुधारलेले होते,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले आहे.