शिक्षणाचे महत्त्व

शिक्षणाचे महत्त्व

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. समाजातील वंचित वर्गांसाठी अगोदर पोहोचले पाहिजे हे सयाजीरावांनी ओळखले. राज्यकारभार हाती येताच दुसर्‍या वर्षी अस्पृश्य-आदिवासी मुलांसाठी सरकारी खर्चाने शिक्षण, निवास, पुस्तके, भोजन व्यवस्था सुरू केली. सहा वर्षाचा मुलगा-मुलगी शाळेत घातली पाहिजे याकरिता सक्तिचे मोफत शिक्षणाचा कायदा केला. शाळेत न येणार्‍या मुलाच्या पालकाला दंड सुरू केला. साक्षरता टिकावी म्हणून गावोगाव वाचनालये सुरू केली. छोट्या गावात फिरत्या पेटीची वाचनालये काढली. ग्रंथ, लेखक, प्रकाशकास मदत केली. भाषांतर विभाग सुरू केला. शिकणार्‍या विद्यार्थ्यास कोट्यवधीच्या शिष्यवृत्त्या दिल्या.