देशाभिमान भाषाभिमान, विधायक कामगिरी, बहुजनसमाजहित दक्षता आणि मुत्सद्देगिरी या बाबतीत सयाजीराव महाराज हे आधुनिक महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे जनक (Maker of Modern Maharastra) आहेत.

– कृ.ग.लिमये, संपादक, ज्ञानप्रकाश, पुणे

साहित्य, शिल्पकला, चित्रकला, मूर्तिकला, नाटक, संगीतकला हे ललित कलांचे विविध अंग राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांच्या संवर्धनासाठी सयाजीरावांनी केलेले काम राष्ट्रसंपत्तीच्या संवर्धनाचे काम आहे.

– दाजी नागेश आपटे

देशाचे भावी आधारस्तंभ बालके शरीर-मनाने सुदृढ व्हावेत म्हणून शाळेत क्रीडा शिक्षणाचा तास सक्तीचा केला. गावोगाव व्यायामशाळा सुरू केल्या. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करवली.

– प्रो. गजानन यशवंत माणिकराव

महाराजांनी मला नोकरी दिली. मॅकियाव्हेलीच्या ’प्रिन्स’चे भाषांतर करण्यास सांगून लेखक बनविले. माझ्या हातून पुढे इतिहासात जे काही लिहून झाले त्याचे सर्व श्रेय श्रीमंत महाराज साहेब यांचेच आहे.

– रियासतकार गो.स.सरदेसाई