– अनंत हरी लिमये (मराठी प्रकाशकांचे स्वरूप)
Archives: Manyvaranchi Vachane
Manyvaranchi Vachane
‘‘भारतवर्ष के वर्तमान सभी राजाओं में बुद्धिमत्ता और देशाभिमान की दृष्टि से सयाजीराव का मेरे मनपरविशेष प्रभाव पडा है।’’
– स्वामी विवेकानंद
‘‘महाराज सयाजीराव गायकवाड आपले सर्वांचे पुढारी, सुधारलेले हिंदी राज्यकर्ते आणि प्रजेशी मिळूनमिसळून वागणारे आहेत.’’
– जमशेदजी टाटा
‘‘महाराजांनी बडोद्यात उच्च हुद्द्यांच्या जागी हिंदुस्थानातील वेगवेगळ्या जातींची लायक माणसं हेरून नेमली.’’
– जमशेदजी टाटा
‘‘महाराज सयाजीराव गायकवाड हल्लीच्या सर्व राज्यकर्त्यांत जास्त विद्वत्ता संपादन केलेले राजा आहेत. ते विद्यावृत्तीकडे लक्ष देतात.’’
– सर फिरोजशहा मेहता
महाराजा सयाजीराव यांना मनापासून वाटायचे की, भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीचा अभ्यास हिंदुस्थानात चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे.
– बौद्ध अभ्यासक डॉ. ए.एल.नायर, मुंबई
श्रीमंत सयाजीराव महाराजा एवढा जगाचा प्रवास करून अनुभव घेतलेली विद्यमान व्यक्ती आज आपणास या देशात दुसरी आढळणार नाही.
– रियासतकार गो.स.सरदेसाई
सयाजीरावांच्या अंगी उद्योगप्रियता, दृढनिश्चय, आत्मसंयमन व नियमाधीनता हे स्थायी स्वरूपाचे गुण दिसून येतात.
– गुरुवर्य इलियट सर
सयाजीराव हे एकमेव उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहेत की त्यांनी त्यांचे स्वप्न वास्तवात उतरविले आहे. प्रसिद्धीच्या आजच्या प्रांगणात सयाजीराव येत्या काळात सर्वांना प्रेरणा देऊ शकतील असे एकमेव व्यक्ती आहेत.
– सर जगदीशचंद्र बोस
हिंदुस्थानातील शेतकऱ्यांच्या पतपेढ्या, सहकारी बँक आणि साखर कारखाना बडोद्यात काढणारे महाराजा सयाजीराव सहकारी चळवळीचे प्रणेते आहेत.
– जी.के.देवधर, अध्यक्ष, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, पुणे