“महाराजा सयाजीरावसारखा राजा भारतात झाला नाही, पुढेही होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा फोटो लावावा. त्यांच्यासारखा नेता किंवा पंतप्रधान ह्या देशाला मिळेल का हो?”

– प्रल्हाद केशव अत्रे

‘‘महाराष्ट्रातील शंभर वर्षांतील कर्तृत्ववान व्यक्तींची मोजदाद करता पहिले नाव घ्यावे लागते सयाजीराव गायकवाडांचे.’’ ‘‘हिंदुस्थानात सध्या प्रगल्भ बुद्धीचे तीनच मुत्सद्दी आहेत आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड.’’

– इतिहासाचार्य वि. का. राजवाडे

‘‘वर्तमानकाळात महाराजामध्ये एका विशाल साम्राज्यावर शासन करण्याची क्षमता आहे. या भारतात एकही राजकारणी नाही ज्यांच्याशी सयाजीराव महाराजांशी तुलना करता येईल.’’

– क्रांतिकारी अरविंद घोष (नंतरचे पाँडेचेरीचे योगी अरविंदो)

‘‘महाराज सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात हरिजनासाठी शिक्षणाची दारं उघडली आणि अस्पृश्यतेचा कलंक भारतात प्रथमच कायद्यानं पुसून अंमलबजावणी केली. या लोकोत्तर कामासाठीच ते सर्वांहून अधिक अभिनंदनास पात्र आहेत.’’

– मो. क. गांधी, येरवडा सेंट्रल जेलमधून पत्र. (8.3.1933)

‘‘बडोदे हे भारतातील महान व्यक्ती तयार करण्याचे ट्रेनिंग स्कूल व भावी स्वतंत्र भारताची प्रयोगशाळाच आहे. स्वतंत्र भारताची शासनव्यवस्था कशी असावी, याचे प्रयोग सयाजीराव महाराज करत आहेत.’’

– लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

‘‘ब्रिटिशांशी लढणाऱ्या क्रांतिकारकांना मदत करून त्यांचा सयाजीरावांनी धैर्यानं बचाव केला, ही हिंदुस्थानातील अनोखी गोष्ट आहे.’’ ‘‘मी आज रियासतकार म्हणून मिरवतो त्याचे श्रेय मुख्यत: सयाजीराव महाराजांचे आहे.’’ ‘‘सयाजीराव महाराजांनी त्यांच्या शाहत्तर वर्षांच्या आपल्या हयातीत एवढे पराक्रम करून दाखविले की, इंग्रजी सत्तेच्या एका शतकात असे दुसरे राजे झाले नाही.’’

– रियासतकार गो.स.सरदेसाई

‘‘बलिष्ठ सार्वभौम सत्तेशी सदैव झगडून आपले कायदेशीर हक्क शिकस्तीने सयाजीरावांनी सांभाळले. समस्त भारतात राजद्रोहाची व खून-जाळपोळीची स्फोटक लाट उसळली, तीत अनेकांचा बचाव महाराजांनी धैर्यानं केला की जेणेकरून हिंदुस्थानास नवीन स्फूर्ती मिळाली.’’

– रियासतकार गो. स. सरदेसाई