वेगळेपण

सयाजीराव महाराजांचे वेगळेपण

०१) गोपाळ हा शेतकऱ्याचा मुलगा. महाराणी जमनाबाईसाहेब यांनी ‘तुम्ही इथं कशाला आलात?’ या प्रश्नाला ‘मी राजा होण्यासाठी आलो आहे.’ असे आत्मविश्वासाने उत्तर दिलेले दत्तक निवड होवून बराव्या वर्षी १८७५ ला सयाजीराव राजा बनले.

Read More

०२) त्यांनी वयाच्या १५व्या वर्षी अहमदाबाद मुक्कामी पंगतीभेद दूर केला. (इ.स.१८७७)

Read More

०३) राज्यकारभार हाती येताच सर्वप्रथम राज्याच्या सर्व भागांची पाहणी केली. (हुजूर सवारी इ.स १८८१ ते इ.स १८८५)

Read More

०४) प्रत्यक्ष राज्यकारभार हाती येताच सयाजीराव महाराजांनी ‘लॉ कमिटी’ची स्थापना केली. (इ.स. १८८१)

Read More

०५) राजाने लेखी ‘हुजूरहुकूम’ देण्याची पद्धत सुरू केली. (प्रशासनात एखादा विचार मनात आला की, तो विसरून जाऊ नये यासाठी ते कार्यालयात, प्रवासात, घोड्यावर रपेट मारताना, झोपण्याच्या पलंगाशेजारी कोरे कागद आणि पेन्सिल सोबत ठेवत.)

Read More

०६) ‘हुजूरहुकूम’ सर्वांना समजावेत यासाठी दर गुरूवारी देशी भाषेत ‘आज्ञापत्रिका’ सुरू केली.

Read More

०७) सयाजीराव महाराजांनी सुरुवातीस ‘न्याय खात्यात’ आणि ‘शेतीच्या कर’ पद्धतीत आमूलाग्र बदल केला.

Read More

०८) सरकारी खर्चाने अस्पृश्य आणि आदिवासींच्या शिक्षणासाठी सोनगड या भागात शाळा सुरू केल्या. (इ.स. १८८२)

Read More

०९) खासगी खाते आणि धर्मखाते एकत्र केले. (इ.स. १८८४)

Read More

१०) गणदेवी या ठिकाणी सहकारी तत्त्वावरचा पहिला साखर कारखाना उभारला. (इ.स. १८८५)

Read More